वसंतराव नाईक चौक परिसरात पं. दीनदयाळ उपाध्याय स्वच्छता मंडळातर्फे स्वच्छता


चंद्रपूर:- सार्वजनिक स्वच्छता हे सार्वजनिक आरोग्याचे एक महत्त्वाचे अंग आहे. रोगांचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी पर्यावरणाचे नियमन करणाऱ्या यंत्रणा विविध प्रयत्न करतात. असे प्रयत्न सार्वजनिक स्वच्छतेचाच भाग असतात. सार्वजनिक स्वच्छतेत व्यक्तिगत स्वच्छताही अंतर्भूत असते. कारण व्यक्तिगत स्वच्छतेमुळे समाजाचे रोगांपासून रक्षण करण्याच्या कामाला मदत होते. असे अभिप्राय माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी दिले,
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लोक सहभागातून चंद्रपूर शहर स्वच्छता व सौंदर्य करण लीग स्पर्धा १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत माझ्या शहरासाठी माझे योगदान या थीमवर वॉर्ड स्तरीय स्पर्धा घेण्यात येत आहे. त्या अंतर्गत ५ नोव्हेंबर२०२२ रोजी माजी नगर सेवक सुभाष कासनगोट्टुवार यांच्या मार्गदर्शनात वसंतराव नाईक चौक जवळ पं. दीनदयाळ उपाध्याय स्वच्छता मंडळ तर्फे मंडळ प्रमुख सौ. प्रद्या गंधेवार यांचा नेतृत्वात स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले.
या मोहिमेत शहरातील एकूण 52 गट सहभागी झाले असून, महापालिका आयुक्त विपीन पालीवाल यांनी त्यांच्या पाहणी दौऱ्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संघाला पहिली भेट दिली, आयुक्त विपीन पालीवाल यांनी स्वच्छता स्थळाची पाहणी केली, व सर्वांचे मनोबल वाढविले.
माजी नगरसेवक श्री सुभाष कासनगोट्टुवार व सर्व सदस्यांनी मिळून वसंतराव नाईक चौक परिसरात स्वच्छता केली. जनावरांचे पुतळे स्वच्छ धुण्यात आले, व स्वच्छतावेळी नारे देण्यात आले, सोबतच सुभाष कासनगोट्टुवार यांनी स्वच्छ्ता स्थळी नागरिकांना स्वच्छताचे महत्त्व व या अभियानाबद्दल माहिती दिल‌. वसंतराव नाईक चौक परिसरात सुरेश कोवे, कुणाल नाश्ता सेंटर, संदीप टी स्टाल दुकानदारांना डस्टबिन देण्यात आले. तसेच चौकाच्या मागच्या परिसरात देखील
कल्पेश चंदनखेडे, निशा राजपूत, आशा वैद्य, लता घोरे, अंजुमा शेख, यांना डस्टबिन व सेंद्रिय खताचे किट देण्यात आले व त्यांना ओला कचरा सुका कचरा व्यवस्थापन, घरच्या घरी खत तयार करण्याची माहिती देण्यात आली.

मंडळ तर्फे वेस्ट ऑफ बेस्ट (टाकाऊ पासून टिकाऊ), टाकाऊ वस्तू पासून चौकाचे सौंदर्यकरण ,वृक्षांची देखभाल, पेंटिंग्जच माध्यमातून घोषवाक्य लिहून जनतेला स्वच्छतेचे संदेश देणे,ओला सुका कचरा वेगळा करणे, कंपोस्तींग करणे,वॉर्ड मध्ये प्लास्टिक बंदी करणे,वॉर्ड मध्ये प्लास्टिक पिशवी बंद करून कापडी पिशवी वापरने ,झाडे लावणे,या सर्व कार्याची माहिती देण्यात आली.
यावेळी . जगदीश चहांदे,विशेष गिरी,शुभम मेश्राम,रतन दातारकर,आशिष ताजने,संजय कोत्ता वार,आनंदराव मांदाडे,राजेंद्र निषेकर, पुरुषोत्तम सहारे,विजय चीता डे,धर्माजी खंगार, वसंतराव धंदरे,प्रमोद वगाडे,विजय ठाकरे, अण्याजी धवस,अमोल तंगडपल्लिवार,जी बी उराडे, अशोक संगिड वार,देवराव ठावरी,कैलाश सुरसाऊत,सुधाकर टिकले,आनंदराव ढेंगळे ,लता लुथडे,निशा राजपूत,प्रीती दडमल,सीमा मडावी,अरविंद मडावी,रामराव धारने,प्रज्ञा गंधेवार,बंडू गौरकार,नरेश वानखेडे,राजेश वाहा डे,भास्कर इसनकर,देवराव बोबडे, गोकुलदास पिंपडकर,नारायण पत रंगे,विठ्ठल देशमुख,सुरेश कनोजवार,बबनराव अनमुल वार , बाळकृष्ण बोंडे,बंडू धोटे,प्रदीप इटन कर,उषा मेश्राम,कमलाबाई, मोहम्मद जीलानी,अजय गिरडकर,दीपा नागरकर,गीता तुरानकर, आदींची उपस्थिती होती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत