Top News

ताडोबा अभयारण्याचे कुणाला अभय ?

ताडोबा अभयारण्याचे कुणाला अभय ?
वाघांना की व्यावसायिकांना ?

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- १७२७ चौ.कि.मी क्षेत्रफळात पसरलेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प शेतकरी, शेतमजूर, पादचाऱ्यांना  हवालदिल करून वाघांना तरी नैसर्गिक आवास देत आहे का ? की आपल्या राजकिय महत्वाकांक्षेपोटी श्रीमंत व्यावसायीकांचे हित जोपासणारे राजकारणी व आणून किती नागरिकांच्या मयतेवर ताव मारणार आहेत हे कळायला वाव नाही ? दररोज  सरासरी 3 ते 5 शेतकरी, शेतमजूर, पादचाऱ्यांना जिवनातून उठविणारी मंडळी वाघांनाही व बफरझोन काठावरील गरीब शेतकऱ्यांच्या जिवनाशी खेळण्याचा गोरखधंदा किती काळ चालविणार हा गहण विषय आहे.

  संपुर्ण चंद्रपूर जिल्हा व गडचिरोली, गोंदिया जिल्यातील काही भागात वाघोबाचे धास्तीने शेतकऱ्यांनी शेती करणे बंद केले. शेती विकायला काढली तर वाघोबाचे धास्तीने कुणी घेत नाहीत. 3 चे 21 गेट ताडोबा भ्रमतीसाठी उघडले गेले. नव्याने श्रीमंतांना एन्जॉय करण्यासाठी ताडोबा बफर झोन गेट सुरू करण्याचा डाव कुणासाठी ? समजून उमजून पेढा खाण्याचा हा प्रकार केवळ अन केवळ विघातक आहे ही ओरड रास्त आहे हेच म्हणता येईल.

  21 गेट च्या ऐवजी 15 गेट ही नैसर्गिक गरज आहे असे बोलले जाते. इकडे तर 22 वा गेट सुरु करण्याचा तगादा श्रीमंत व्यावसायीकांनी वनमंत्री यांचेकडे लावला आहे.
      या व्यावसायीकांच्या जमिनी बफर झोन काठावर खाली पडल्या आहेत. रिसोर्ट उभे करून पैसा कमवायचा यापेक्षा वाघ, बिबट यांना नैसर्गिक रहिवास उपलब्ध करून देऊन शेतकरी, शेतमजूर यांना भयमुत्त वातावरणात पोट भरण्यास मदत करण्याची गरज या धंदेवाईकांना का न समजावी हे कळायला वाव नाही.
     ताडोबा अभयारण्याचे रुपांतर आता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये झाले आहे. 1955 मध्ये या प्रकल्पाची सुरवात झाली तेव्हा या अभयारण्याचे 1727 चौ. किलोमीटर परिसरात जेमतेम असलेल्या 3 प्रवेशद्वारातून पर्यटक व वाघप्रेमींना काही क्षेत्रातून विहार करून या अभयारण्याच्या मनमोहकतेचा आनंद व प्रसंगी वाघदर्शनाचा आनंद लुटता येत असे.
    वाघ व बिबट या प्राण्यांकरिता अतिशय सुरक्षीत समजल्या जाणाऱ्या या अभयारण्यात वाघ व बिबट यांची संख्या झपाटयाने वाढली व आज वनविभागाचे माहितीनुसार 151 वाघ व 151 बिबट या प्रकल्प क्षेत्रात असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा व भारतातील 47 व्याघ्रप्रकल्पात ताडोबा अंधारी प्रकल्पाचा समावश असल्याचे अभिमानाने सांगता येत असले तरी गत 5 वर्षापासून या क्षेत्रातील बफर व कोअर झोन मध्ये वाघ व बिबट हल्ल्यात जखमी वा मरण पावलेल्यांची संख्या बघता संपुर्ण चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयाचे आरमोरी, वडसा तालुका क्षेत्रात अतिशय भयग्रस्त वातावरणात नागरिकांना वावरावे लागते. मिळालेल्या माहितीनुसार दरदिवशी सरासरी 3 ते 5 अशा वाघ व बिबट हल्ल्याच्या घटना कोअर व बफर झोन मध्ये घडत आहेत व यात वर्षाकाठी शेकडो शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ, गुराखी, जळावू इंधन जमा करणाऱ्या स्त्रियासह पादचाऱ्याना आपला जिव गमावला आहे, गमवावे लागत आहे. (क्रमश:)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने