Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

जुनगाव येथील पुल पोंभुर्णा तालुक्यातील नागरिकांचा विकासाचा मार्ग ठरेल..! #Chandrapur #pombhurna


जुनगाव चार्मोशी मार्गावर वैनगंगा नदीवर मोठा पुल लवकरच बांधण्याची दिली ग्वाही..!
चंद्रपूर:- पावसाळ्यात महिना- महिनाभर पुराच्या वेढ्यात राहून संपर्क
तुटणा-या जुनगावाला आता पोंभुर्णा आणि चार्मोशी मार्गावर दोन मोठे पूल बांधण्यात येणार आहे. हे पुल जुनगाव व लगतच्या गावांसाठी कायम विकासाचा मार्ग ठरतील, असा विश्वास आज आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला.
जुनगाव ते पोंभुर्णा मार्गावरील पुलाचा भूमिपूजन कार्यक्रम आज संपन्न झाला. यावेळी जुनगाव येथील ग्रामस्थांनी जागोजागी औक्षवान केले ,फटाक्याची आतिषबाजी करत जंगी स्वागत केले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरूण गाडेगोणे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, पंचायत समितीचे माजी उपसभापती विनोद देशमुख,माजी पंचायत समिती सदस्य गंगाधर मडावी,सरपंच पूनम चौधरी, उपसरपंच राहुल पाल,हरी ढवस, ओमदेव पाल ,अजय मस्के, पांडुरंग पाल,उपविभागीय अभियंता मुकेश टांगले प्रामुख्याने उपस्थित होते.


या पुलासाठी 24 कोटी 76 लक्ष रक्कम मंजूर केली असल्याचे सांगून जुनगाव ते चार्मोशी मार्गावरील दुसऱ्या पुलासाठी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचेतर्फे 70 कोटी रु. निधीला मंजूरी देण्यात आली आहे. या दोन्ही पुलाचे बांधकाम पुढील दोन वर्षाच्या आत पूर्ण करण्यात येईल, असे यावेळी सांगितले.
'हेल्थ इज वेल्थ' ध्यानात ठेवून आरोग्यसेवेचे बळकटीकरण, आजच्या बालकांच्या उज्वल भविष्यासाठी उत्तम शिक्षणपद्धती, शेतीसाठी बारा महीने पाणी, गरजूंना घरकुल आदी विकासकामांच्या माध्यमातून पोंभुर्णा तालुक्याच्या निरंतर विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी दिली.
यावेळी बहारदार संचालन करणा-या जुनगाव जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी नटेश्वर तिवारी व राजेश्वरी गेडाम यांचे कौतुक केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आपले विचार व्यक्त केले, या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत