Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात #chandrapur #gadchiroli #accident


गडचिरोली:- गडचिरोली (gadchiroli) जिल्ह्यामध्ये एक भीषण अपघाताची (accident) घटना उघडकीस आली आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये ट्रॅक्टरचे अक्षरश: 3 तुकडे झाले.

सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातात 2 चिमुकले थोडक्यात बचावले आहेत. मात्र ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
गडचिरोली जिल्ह्यात कोरची मुख्यालयापासून अंदाजे 15 ते 16 किमी अंतरावर आलेवाडा परिसरात हा अपघात झाला. मुरारी कुंजाम राहणार बेतकाठी येथील हा शेतकरी स्वतःच्या मालकीचे धान्य भरून येत होता. त्यावेळी अचानक समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोराची धडक दिली. भरधाव कारच्या (car) धडकेनंतर ट्रॅक्टरचे (tractor) अक्षरश: 3 तुकडे झाले.
या अपघातग्रस्त (accident) ट्रॅक्टरमध्ये 5 लोक बसले होते. यामध्ये 2 चिमुकल्यांच्या सुद्धा समावेश होता. परंतु, सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. ट्रॅक्टरमध्ये असलेल्या राकेश नैताम बेतकाठी यांच्या छातीला आणि पायाला दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस या अपघाताचा (accident) पुढील तपास करत आहेत.

#WorldCupQatar2022 #FIFAWorldCup #EnglandvsIran #BharatJodoYatra

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत