Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo



 

चंद्रपूर जिल्‍हयातील ३० तलावांचे प्रलंबित मासेमारी ठेके मंजूर #chandrapur #sudhirmungantiwar


मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या निर्देशानुसार झाली कार्यवाही
चंद्रपूर:- मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या निर्देशानुसार चंद्रपूर (chandrapur) जिल्‍हयातील ३० तलावांचे प्रलंबित मासेमारी ठेके मंजूर करण्‍यात आले असून या माध्‍यमातुन जिल्‍हयातील सहकारी मासेमारी संस्‍थांची मागणी पूर्णत्‍वास आली आहे.
दिनांक १९ नोव्‍हेंबर रोजी जिल्‍हा तलाव ठेका निर्धारण समितीची बैठक सहाय्यक आयुक्‍त, मत्‍स्‍यव्‍यवसाय चंद्रपूर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झाली. या बैठकीत जिल्‍हयातील ३० तलावांचे मासेमारी ठेके मंजूर करण्‍यात आले आहे. नागपूर (Nagpur) येथील महाराष्‍ट्र पशु व मस्‍त्‍य विज्ञान विद्यापीठ येथे मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी घेतलेल्‍या बैठकीत चंद्रपूर जिल्‍हयातील सहकारी मासेमारी संस्‍थांच्‍या प्रतिनिधींनी प्रलंबित मासेमारी ठेके मंजूर करण्‍याची मागणी केली होती. या बैठकीत श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी त्‍वरीत तलाव ठेका निर्धारण समितीची बैठक घेवून प्रलंबित ठेके मंजूर करण्‍याचे निर्देश दिले होते. त्‍यानुसार १९ नोव्‍हेंबर रोजी झालेल्‍या बैठकीत सदर ठेके मंजूर करण्‍यात आले आहे.
चंद्रपूर जिल्‍हा मत्‍स्‍यव्‍यवसाय सहकारी संघाचे अध्‍यक्ष पांडूरंग गेडाम आणि सर्व संचालकांनी भाजपा नेते श्री. नंदू रणदिवे यांच्‍या माध्‍यमातुन सदर मागणी रेटत पाठपुरावा केला होता. चंद्रपूर जिल्‍हा मत्‍स्‍यव्‍यवसाय सहकारी संघाच्‍या प्रतिनिधींना मत्‍स्‍यव्‍यवाय मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेला शब्‍द पूर्ण केला आहे. सदर प्रलंबित तलाव ठेके मंजूर झाल्‍याने ग्रामीण भागातील भोई समाज बांधवांना याचा मोठया प्रमाणावर लाभ होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत