गडचिरोली:- डॉ. गेठे हे नेहमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असतात. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या पाठोपाठच मुख्यमंत्री शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) डॉ.राहुल गेठे यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
महाविकास आघाडी सरकाराच्या काळात एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. त्यावेळी डॉ.राहुल गेठे यांनी या भागातील आरोग्य आणि शिक्षणाच्या संबंधित कामे केली होती. त्यांनी पुढाकार घेऊन गडचिरोली येथे आरोग्य आणि शिक्षण योजना राबवल्या होत्या. त्यावेळी नक्षलवाद्यांकडून गेठे यांच्या कामात अडथळे आणण्याचे काम केले होते. विकास कामे न करण्यासाठी धमक्या दिल्या जायच्या.
सध्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर गडचिरोली विकास कामे करण्यासाठी आदेश दिले आहेत. डॉ. गेठे हे नेहमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असतात. त्यामुळे त्यांना नक्षलवाद्यांकडून धमकी देण्यात आली असल्याचं म्हटलं जातं आहे. लाल शाईने लिहलेलं पत्र राहुल गेठे यांच्या निवासस्थानी आले होते. त्यांना धमकीचे पत्र आल्यानंतर राज्यातील तपास यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.
डॉ. राहुल गेठे यांना नक्षलवाद्यांनी पत्राद्वारे पाठवलेला मजकूर
जय लाल सलाम
जय किसान
डॉक्टर राहुल गेठे को आखरी चेतावणी
एकनाथ शिंदे का ॲाफिसर डॉक्टर राहुल गेठे बहुत उड रहा है. हमारा नुकसान गडचिरोली मे बहुत कर रहा है. हम हमारे भाईयों का बदला जलद ही लेने वाले है. उसकी मौत का एलान निकल चुका है. महाराष्ट्र सरकार को उसकी जबाबदारी जितना लेना हे ले लो.
जय नक्षलवाद