Top News

वांगे समजून धोतरा फळाची भाजी खाल्ल्याने अख्ख कुटुंब पोहचलं रुग्णालयात #chandrapur #gondpipari

गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी गावात वांगे समजून धोतरा फळाची भाजी खाल्ल्याने अख्ख कुटुंब रुग्णालयात पोहचले. कुटुंबातील पाच व्यक्तींची प्रकृती बिघडली आहे.
उपचारासाठी सर्वांना गोंडपिपरी ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काहींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

कुटुंबप्रमुख किसन सोमा खंडारे (६०), त्यांची पत्नी सीताबाई किसन खंडारे (६०), मुलगा तुळशीदास किसन खंडारे (४०), सून रेखा तुळशीराम खंडारे (४०), कमला गणेश नेवारे (४०), अर्चना श्रीकृष्ण नेवारे (४०) व विभा विलास सरवर (१६), शैलेश कोडापे या सात जणांना विषबाधा झाली.
गणेशपिपरी ग्रामपंचायत कार्यालयालगतच्या परिसरात धोतराचे झाडाला लागलेले फळ हुबेहूब वांग्यासारखे दिसले. गावातील खंडारे कुटुंबातील महिलांनी ही फळभाजी तोडून भाजी करत जेवण केले.यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला.पोटात मळमळ आणि उलटी सुरू झाली. ही विषारी धोतऱ्याची भाजी असल्याचे समजताच पाचही व्यक्तींना उपचारासाठी गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्वांवर होणाऱ्या उपचारावर देखरेख केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने