मुरब्याना चित करणारा 'ओमराज पवार ' #chandrapur #Korpana

कोशिश करने वालो की कभी हार नही होती. बिना कुछ किये जय जयकार नही होती! अस म्हटलं जातं ते काही खोटं नाही. कालपर्यंत सर्वासाठी बच्चू वाटणारा हाच युवा कार्यकर्ता धानोली ग्रामपंचायतीत भाजपाचा दुसऱ्यांदा सलग विजयासाठीचा शिल्पकार बनला.
ते दुसरं तिसरं नाव म्हणजे कोणतं नव्हतं. ते म्हणजेच भाजयूमोचे जिल्हा उपाध्यक्ष ओमराज पवार महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी चा सक्रिय कार्यकर्ता बनवून गाव विकासासाठी पवारांनी चंग बांधला. कुणाचं मरण असो की कुणाचा दवाखाना सर्वांसाठीच त्यांनी झपाटून वाहून घेत आपल अविरत कार्य सुरू केलं. कदाचित ते बाळकडू त्याला त्याच्या पालकाकडूनच मिळालं असावं. त्याचे वडील प्रल्हाद पवार हेही झंझावातीच नेतृत्व ! मोडेल पण वाकणार नाही. लोकहित हेच माझे हीत तत्व जोपणार व्यक्तीमत्व तो गाडा ओमदादा नी कार्यरूपातून सुरू ठेवला.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बलाढ्यविरोधकांच्या आखाड्यात उतरून कसदार पैलवानाची झुंज खेळत विजयश्री खेचून आली. विजयानंतर न थांबता गाव विकासाचा चंग बांधलेला असताना त्यांनी ग्राम स्वच्छतेची व्यापक मोहीम उभारली. अन् अनेक सढळ कार्य कर्तुत्वान उभे हात झपाटून कार्य करू लागले. याचीच पोचपावती देत गावकऱ्यांनी काल परवा बच्चू वाटणारा हा शुक्रवारी रांगड्या युवकावर उपसरपंच पदाची ही मानाची धुरा सोपविली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत