Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

चंद्रपूरात धारदार शस्त्राने युवकाची हत्या #chandrapur #murder


धडावेगळे केले शीर

चंद्रपूर:- चंद्रपूरलगत असलेल्या दुर्गापूर परिसरात चंद्रपूर वीज निर्मिती केंद्राच्या मेजर गेट जवळ नायरा पेट्रोल पंपजवळ एका इसमाची धारदार शस्त्राने धडावेगळे शीर करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी रात्री 10.45 वाजताच्या सुमारास घडली. महेश मेश्राम (32) रा. आयप्पा मंदिर परिसर चंद्रपूर असे मृतकाचे नाव असल्याचे बोलले जात आहे. मात्र याला दुजोरा मिळाला नाही या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळापासून काहीच अंतरावर दुर्गापूर पोलीस ठाणे आहे. सुमारे ४-५ जणांनी मिळून आरीने शीर कापून हत्या केल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती होताच दुर्गापूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच घटनास्थळावरून हलविला.
दुर्गापूर येथे रात्री 12.20 वाजता पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी हे ठाणेदार स्वप्नील धुळे यांच्याकडून घटनेची माहिती जाणून घेत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत