Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

पोंभुर्णा तालुका कृषी अधिकारी कार्यालय बांधकामासाठी २ कोटी ५० लक्ष रु निधी मंजूर #chandrapur #pombhurna #sudhirmungantiwar


पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलीत


चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पोंभुर्णा तालुका कृषी अधिकारी कार्यालय बांधकामासाठी २ कोटी ५० लक्ष रु निधी मंजूर करण्यात आला आहे. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२२- २३ अंतर्गत सदर कृषी अधिकारी कार्यालय बांधकामासाठी २ कोटी ५० लक्ष रु निधीला दि. २२ नोव्हेम्बर २०२२ रोजीच्या आदेशानुसार प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

पोंभुर्णा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची स्वतंत्र इमारत नसल्याने गैरसोयीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत होता. पोंभुर्णा तालुक्यात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. या तालुक्यातील शेतकरी बांधवांना शेती विषयक कामांसाठी सतत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जावे लागते. स्वतंत्र इमारत नसल्याने या कार्यालयात येणाऱ्या शेतकरी बांधवांना गैरसोय सहन करावी लागत असल्याने शेतकरी बांधवांनी पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे इमारत बांधकामासंदर्भात मागणी केली होती.

श्री मुनगंटीवार यांनी शेतकरी बांधवांना कृषी अधिकारी कार्यालय बांधकामासाठी निधी तातडीने मंजूर करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. शेतकरी बांधवांना दिलेला शब्द श्री सुधीर मुनगंटीवार यांनी पूर्ण केला असून त्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. सदर कार्यालयाच्या स्वतंत्र इमारतीच्या माध्यमातून आता प्रशासकीय कामकाज वेगाने होण्याचा मार्ग सुकर व सुलभ झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत