स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण सत्राचे आयोजन ... #Chandrapur

Bhairav Diwase
0चंद्रपूर:- वर्ग तीन आणि चार पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेची आदिवासी उमेदवारांकडून तयारी करून घेण्याकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रातर्फे साडेतीन महिन्यांचे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले आहे.
एक डिसेंबर ते पंधरा मार्च या कालावधीत होणाऱ्या प्रशिक्षण सत्राकरिता अनुसूचित जमातीतील आदिवासी उमेदवारांनी २१ नोव्हेंबरपर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन, पहिला माळा, हॉल क्र. १९ चंद्रपूर येथे अर्ज सादर करावे, असे आवाहन , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांनी केले आहे.

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)