Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

पोलिस भरती बाबत मोठी बातमी.... #Chandrapur


राज्यात पोलिस भरतीचा मार्ग मोकळा! वयोमर्यादेत शिथिलता अन्...
मुंबई:- राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने काही दिवसांपूर्वी पोलिस भरती जाहीर केली होती. मात्र, त्यांनतर लगेचच काही तांत्रिक मुद्दा समोर आल्यामुळे ही भरती पुढे ढकलल्याची माहिती दिली होती. पण, आता हा तांत्रिक मुद्दा दूर झाला आहे आणि राज्यात पोलिस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
पोलिस भरतीमध्ये हजारो रिक्त पदे भरण्यात येणार होती. मात्र, कोरोना काळात ज्या उमेदवारांनी पोलिस भरतीचा फॉर्म भरला आहे अशा उमेदवारांना या भरतीत जागा मिळेल का? यावर प्रश्नचिन्ह होते. अशा उमेदवारांनी सरकारकडे दादही मागितली होती. त्यामुळेच आता सरकारने आणि गृहविभागाने मोठा निर्णय घेत अशा उमेदवारांना पोलिस भरतीची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना काळात ज्यांनी फॉर्म भरले आहेत, त्यांची वयोमर्यादा समाप्त झाली होती. त्यामुळे ते परीक्षेला बसण्यासाठी पात्र नव्हते. तर आता अशा उमेदवारांच्या वयोमर्यादेत शिथिलता आणण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. त्यामुळे या सर्वच उमेदवारांना आता पोलिस भरतीसाठी संधी मिळणार आहे. तसेच यामुळे पोलिस भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील पुढील ठिकाणी भरल्या जाणार जागाः

मुंबई - 6740, ठाणे शहर - 521, पुणे शहर - 720, पिंपरी चिंचवड - 216, मिरा भाईंदर - 986, नागपूर शहर - 308, नवी मुंबई - 204, अमरावती शहर - 20, सोलापूर शहर- 98, लोहमार्ग मुंबई - 620, ठाणे ग्रामीण - 68, रायगड -272, पालघर - 211, सिंधूदुर्ग - 99, रत्नागिरी - 131, नाशिक ग्रामीण - 454, अहमदनगर - 129, धुळे - 42, कोल्हापूर - 24, पुणे ग्रामीण - 579, सातारा - 145, सोलापूर ग्रामीण - 26, औरंगाबाद ग्रामीण- 39, नांदेड - 155, परभणी - 75, हिंगोली - 21, नागपूर ग्रामीण - 132, भंडारा - 61, चंद्रपूर - 194, वर्धा - 90, गडचिरोली - 348, गोंदिया - 172, अमरावती ग्रामीण - 156, अकोला - 327, बुलढाणा - 51, यवतमाळ - 244, लोहमार्ग पुणे - 124, लोहमार्ग औरंगाबाद -154, एकूण - 14956
कोणत्या प्रवर्गाला किती जागा?

अनुसूचित जाती - 1811, अनुसूचित जमाती - 1350, विमुक्त जाती (अ) - 426, भटक्या जमाती (ब) - 374, भटक्या जमाती (क) -473, भटक्या जमाती (ड) - 292, विमुक्त मागास प्रवर्ग - 292, इतर मागास वर्ग - 2926 इडब्लूएस - 1544, खुला - 5468 जागा, एकूण - 14956

1 टिप्पणी: