Top News

'व्हॉईस ऑफ मीडिया‘च्या महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी राजा माने यांची निवड.

पत्रकारांची चळवळ उभारु !
राजा माने यांचा संकल्प.


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात
मुंबई: 'व्हॉईस ऑफ मीडिया‘च्या राज्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, संपादक राजा माने यांची निवड करण्यात आली आहे. माने हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. संपादक, लेखक, संघटक अशा अनेक भूमिकांतून गेलेल्या माने यांनी अनेक संघटनांमध्येही काम केले आहे. माने यांच्या निवडीने त्यांचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. 'व्हॉईस ऑफ मीडिया‘च्या माध्यमातून राज्यभर पत्रकारिता, आणि पत्रकारांसाठीची चळवळ उभारू, असे मत राजा माने यांनी यावेळी व्यक्त केले.
    'व्हॉईस ऑफ मीडिया‘ ही संघटना देशातल्या २१ राज्यांमध्ये कार्यरत आहे. पत्रकारांच्या, आणि पत्रकारितेच्या हितासाठी लढणाऱ्या या संघटनेत महाराष्ट्र राज्याची जबाबदारी माने यांच्याकडे देण्यात आली आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया‘ चे राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, ‘व्हॉईस ऑफ मीडिया‘ या संघटनेचे संस्थापक, तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष धर्मेंद्र जोरे,  संघटनेचे संचालक तथा विधीज्ञ अॅड. समाधान काशीद यांच्या हस्ते माने यांना पत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. येत्या चार दिवसांत माने हे राज्याची कार्यकारिणीही घोषित करणार आहेत. निवडीनंतर बोलताना माने म्हणाले, आपल्या महाराष्ट्र राज्याला पत्रकार आणि पत्रकारितेची मोठी परंपरा  आहे. पत्रकारिता एक मिशन, चळवळ म्हणून येथे केली जाते. या पत्रकारितेच्या चळवळीची चाके अजून गतिमान व्हावीत यासाठी  'व्हॉईस ऑफ मीडिया‘चा झेंडा खांद्यावर घेऊन माझा प्रवास सुरू असेल. 'व्हॉईस ऑफ मीडिया‘ च्या माध्यमातून देशभरातील पत्रकारांसाठी जी ध्येयधोरणे हाती घेतली आहेत. त्यांची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यातही होईल, असेही यावेळी माने म्हणाले.    
‘व्हॉईस ऑफ मीडिया‘ च्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास ‘व्हॉईस ऑफ मीडिया‘चे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने