Top News

समोर वाघ येताच हृदयविकाराने प्रवीणचा मृत्यू! #Death #Tiger #mul

मुल:- येथील रहिवासी तसेच निक फॉर्मा कंपनीचे संचालक व वैद्यकीय व्यवसायी प्रविण नारायण मराठे (52) यांचे गुरुवार, 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान हदयविकाराने निधन झाले. सकाळी फिरताना वाघ दिसल्याने घाबरून वेगाने पायदळ येत असताना त्यांना हदयविकाराचा झटका आल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
शांत, संयमी, होतकरू आणि उत्साही व्यक्तीमत्व म्हणून प्रवीण मराठे मित्र परिवारात परिचीत होते. ते सकाळी 7 वाजताच्या दरम्यान मूल-चंद्रपूर मार्गावर फिरायला गेले होते. आरोग्याला जपणारे प्रवीण व्यायामाच्या निमित्ताने चंद्रपूर मार्गावर नियमित फिरायला जात होते. पण नेहमीप्रमाणे सकाळी चंद्रपूर मार्गावर फिरायला जाणार्‍या मंडळींना प्रवीण मराठे मार्गाच्या कडेला सकाळी पडलेले दिसले. त्यांना स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या परिसरात वाघ व हिंस्त्र प्राणी मुक्त संचार करीत असतात. ते फिरून परत येत असताना काही अंतरावर त्यांना वाघ दिसला.
अचानक बाजूलाच वाघ दिसल्याने ते घाबरले असावे आणि आपला जीव वाचविण्यासाठी ते रस्त्याच्या कडेने वेगाने येत असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला असावा, अशी शंका व्यक्त केल्या जात आहे. त्यांच्या पार्थिवावर उमा नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मूली, एक भाऊ व एक बहिण,जावई असा मोठा आप्तपरिवार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने