Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

कृष्णा टॉवर ओपन स्पेस परीसरात मर्दानी स्वच्छता टिम तर्फे स्वच्छता #chandrapur


अंजली घोटेकर यांनी दिला प्लास्टिक मुक्तिची संदेश
चंद्रपूर:- दिनांक. १० नोव्हेंबर ला चंद्रपूर महानगर पालिकेच्या स्वच्छता लिग स्पर्धा अंतर्गत मर्दानी स्वच्छता टिम विवेक नगर चंद्रपूर द्वारे कृष्णा टॉवर ओपन स्पेस ची स्वच्छता करण्यात आली. त्या जागेवर खुप कचरा व झाडे झुडपे वाढलेली होती अशा वेळी सोसायटीतील सर्व महिला व पुरुषांनी कॅप्टन अंजली घोटेकर यांच्या नेतृत्वात स्वच्छता केली‌.
यावेळी अंजली घोटेकर बोलताना म्हणाले की, आपण ज्या पद्धतीने घरं स्वच्छ करत असतो त्याच पद्धतीने आपण सर्वांनी मिळून आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ करावा. आजूबाजूचा परिसर स्वच्छ केल्यास रोगराईवर पसरणार नाही. त्यासोबतच परिसरातिल लोकांनी प्लास्टिक मुक्तिची संदेश देऊन कापडी पिशवीचा वापर करावा. तसेच ओला कचरा व सुखा कचरा गोळा करून महानगरपालिकेच्या घंटा गाडीत टाकावा. असे सांगितले.
यावेळी सोसायटीतील प्रज्ञा घरोटे, ममता नुत्यालवार, आशा झोडे, रेवती चक्नलवार, धनश्री जाधव, सुषमा घटे , किरन जोशी, अल्का शेंडे, हर्षदा काछ्ठेला, चांडक, देवांगन,वडियलवार , रेगुंडवार,पीसे,घरोटे, बारहाते, गंदेवार, हिवरे तसेच परिसरातील महिला व पुरुष यांचा सहभाग होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत