Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo



 

शिष्यवृत्ती परीक्षेत ढोरवासा केंद्र भद्रावती तालुक्यातून अव्वल #chandrapur


चंद्रपूर:- नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत ढोरवासा केंद्राने तालिक्यातून अव्वल क्रमांक पटकावला आहे.
31 जुलै ला झालेल्या महाराष्ट्रात इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत भद्रावती तालुक्यातील ढोरवासा केंद्राने 23 विद्यार्थी पात्र करून पहिला क्रमांक पटकावला 7 नोव्हेंबर ला घोषित झालेल्या या निकालात जिल्हा परिषद शाळा गवराळा चे 7 विद्यार्थी, जिल्हा परिषद शाळा चिरादेवी चे 5 विद्यार्थी, जिल्हा परिषद शाळा ढोरवासा चे 4 विद्यार्थी, जिल्हा परिषद शाळा पिपरी चे 3 विद्यार्थी, जिल्हा परिषद शाळा घोनाड चे 3 विद्यार्थी व जिल्हा परिषद शाळा मुरसा चा 1 विद्यार्थी पात्र ठरला आहे असे एकूण 23 विद्यार्थी पात्र ठरवून केंद्राने तालुक्यातून अव्वल क्रमांक प्राप्त केला
पात्र विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय गटशिक्षणाधिकारी मा. श्री. डॉ. प्रकाश महाकाळकर, केंद्रप्रमुख श्री भारतजी गायकवाड व आपल्या शिक्षकांना देतात.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत