घरफोडी करणाऱ्या ४ चोरट्यांना पोलीसांनी ठोकल्या बेडया #gadchiroli #chandrapur

Bhairav Diwase

चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागीने/ मोबाइल केले हस्तगत
गडचिरोली:- दिवाळी व भावी सणाच्या तोंडावर अनेकजन कुटुंबासह बाहेर गावी त्याची संधी साधुन काही अज्ञात चोरटे घरफोडी करून सोन्याचे दागीने व इतर महागडया वस्तु लंपास करतात अशातच २४ आक्टोबर २०२० रोजी पोलीस ठाणे गडचिरोली हद्दीतील विनायक कुंभारे रा. रेडिगोडाऊन चौक गडचिरोली हे त्याचे राहते घराला कुलूपकोंडा लावून बाहेर गावी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्यानी त्याचे राहते घराचे कुलूपकोंडा तोडून घरात प्रवेश करून लाकडी आलमारीत ठेवलेले सोन्याचे / चांदीचे दागिने , स्मार्ट फोन असा ४६ हजार ५० रु मुद्देमाल चोरुन नेला.
तसेच दुसऱ्या एका घटनेत ०३ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रशांत गणेश सरकार रा. नेहरुवार्ड गडचिरोली हा सुद्धा कुटुंबासह घराला कुलूपकोंडा लावून बाहेरगावी गेला असल्याची संधी साधुन अज्ञात चोरटयांनी त्याचे घराला लावलेले कुलूप तोडून घरात प्रवेश केला व सोन्याचे / चांदीचे दागीन असा एकून ४९ हजार रु
माल चोरुन पळून गेले. दोन्ही प्रकरणामध्ये फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरून पोस्टे गडचिरोली येथे विविध कलमानव्ये गुन्हे नोंद करून तपासात घेतला.
सदर दोन्ही गुन्हयात गचिरोली पोलीसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवून तांत्रीक पुरावा व गोपनीय माहीतीच्या आधारे इसम गुलाब अहमद महमुद आलम शहा (३२), शाहीद अल्ली हमीद अली शहा (१९), करीम वसुला शहा (२०), असलम अजीमउल्ला शाह (१९) सर्व रा. जिगणी ता. उतरेला जि. बलरामपुर (उत्तर प्रदेश) ह.मु. आरमोरी ता. आरमोरी जि. गडचिरोली यांना ताब्यात घेवून अधिक विचारपुस केली. असता नमुद ४ आरोपीतांनी गुन्हयाची कबुली देवून घरफोडी केलेले सोन्या चांदीचे दागीने त्यात सिम कार्ड नसलेला आयफोन मोबाइल, दिवां कपनीचा एक मोबाइल, लावा कंपनीचा एक मोबाइल, ४ कानातील सोन्याचे टॉप्स नग, चांदीची चाळ, बंदी चाळ ४ नग, बेदी बारे ५ नम असा साधरणता ४६ हजार रुपये तसेच दुस-या घटनेतील नाकातील सोन्याची नथ, चादीच्या पायपटया ४ नग, चांदीचे जो ५ नग असा एकून ४९ हजार रुपये असा एकून १५ हजार रुपयाचे सोन्या/चांदीचे दागीने, मोबाइल, आरोपीताकडून जप्त करण्यात आले आहे.
अधिकचा तपास पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कलाम यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा विलास उराडे, पोना सचिन आहे, पोना धनजय चौधरी, पांना / स्वप्नील कुडावले, मपोअ / टॉवरे हे करीत आहेत.