गडचिरोली:- आमदार डॉ. देवराव होळी यांची गोंडवाना विद्यापीठाच्या अधीसभेवर महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून नामनिर्देशित करीत असल्याबाबतचे पत्र महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव शिवदर्शन साठ्ये यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहे.
आमदार होळी हे उच्च विद्याविभूषित आहेत. त्यांनी एमबीबीएस पर्यंत आपले शिक्षण पूर्ण केले असून त्यांनी 15 वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून जिल्ह्यात सेवाही दिलेली आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या विकासात त्यांचेही योगदान आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल गडचिरोली जिल्हावासियांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत