Top News

लाईनगुडा या अतिदुर्गम भागात ब्लॅंकेटचे वितरण #Rajura


महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राजुराचे उपक्रम

राजुरा:- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई शाखा राजुराचे वतीने लाईनगुडा या अति दुर्गम भागात २७ नोव्हे. रोज रविवारला भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून ब्लॅंकेट वितरणाचा उपक्रम आयोजित करण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा. महेश पानसे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विरुर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल होते. विशेष अतिथी म्हणून मूल येथील पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजूलवार तर शिक्षक प्रभाकर धोटे होते.




सामाजिक दायित्व जोपासत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या बॅनर खाली असे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रा. महेश पानसे यांनी स्पष्ट केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांनी सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यास नेहमी तत्पर असल्याचे सांगितले .

त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राजुराचे मार्गदर्शक प्रा. अनंत डोंगे, अध्यक्ष ॲड. राहुल थोरात, संजय रामटेके, जगतसिंग वधावन, राकेश कलेगुरवार, लोकेश पारखी, अनिलकुमार गिरमिल्ला, कैलास कार्लेकर, गौरव कोडापे, तसेच विरुर स्टेशन येथील पत्रकार व जेष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता ठाणेदार राजुरा संतोष दरेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील बोकडे, डोंगरगाव येथील उपसरपंच प्रकाश चव्हाण, जंगु मडावी यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनंत डोंगे यांनी केले. संचालन ॲड. राहुल थोरात यांनी केले तर आभार लोकेश पारखी यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने