चंद्रपूर:- घुग्घुस येथील श्रीराम वॉर्डातील वृद्ध इसमाने गळफास (hanging) घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना शनिवारी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास घडली. पोचम रामय्या त्रिकुटला (७०) असे आत्महत्या करणाऱ्या वृद्धाचे नाव आहे.
बल्लारपूर रेल्वे स्टेशनचा उडानपुल कोसळला
पोचम रामय्या त्रिकुटला हे अर्धागवायूने (Paralyzed) ग्रस्त होते. ते सकाळी शौचालयास बाहेर जातो म्हणून निघून गेले. दरम्यान, गोंडी स्टेडियमजवळ बाभळीच्या झाडाला (tree) गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.