वाघाच्या हल्ल्यात बैल ठार #Tiger #tigerattack


डोंगर हळदी बिटातील कक्ष क्रमांक ५२६ मधील घटना
पोंभूर्णा :- महाराष्ट्र वनविकास महामंडळच्या चिचपल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या डोंगर हळदी बिटातील कक्ष क्रमांक ५२६ वन नियत क्षेत्रात पट्टेदार वाघाने बैलाला हल्ला चढवून ठार केल्याची घटना शुक्रवारला दुपारच्या सुमारास घडली. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून ऐन चुरण्याच्या हंगामात बैल दगावल्याने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
डोंगर हळदी बिटातील देवाडा खुर्द गावालगत असलेल्या कक्ष क्रमांक ५२६ येथील जंगल परिसरात देवाडा खुर्द येथील मुर्लीधर केशव सोमनकर याचा बैल चराई करीत होता. झुडूपात दबा धरून बसलेल्या वाघाने बैलावर हल्ला चढवून त्याला ठार केले.ऐन चुरण्याच्या हंगामात बैल दगावल्याने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळेल असून शेतकऱ्याचे ४० हजाराचे नुकसान झाले आहे. सदर बैल मालकाला तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत