Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

दोन आरोपींना अटक; 4 हजार किलो सहित गोमांस जप्त.

दोन आरोपींना अटक; 4 हजार किलो सहित गोमांस जप्त.
विरुर पोलीसांची कार्यवाही.


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगतसिंग वधावन, विरुर स्टे.
विरुर स्टे.:- ट्रकद्वारे गोमांस तस्करी करताना 4 लाख रुपये किमतीच्या गोमांस आणि 13 लाख रुपयांचा ट्रकसह 2 आरोपींना विरुर पोलीसांनी अटक केली.
      गोमांस ट्रकद्वारे वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानुसार राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथील पोलिसांनी नाकाबंदी करीत धानोरा आर्वी टर्निंग पाइंट जवळ सदरचा ट्रक थांबवून तपासणी केली असता ट्रकमध्ये सुमारे 4 लाख रुपये किमतीचे 4 हजार किलो गोमांस आढळून आले.
यावरून गोमांस सह ट्रक ताब्यात घेऊन आरोपींना पोलीस ठाण्यात आणण्यात आले आरोपीच्या चौकशीवरून 4 लाख किमतीचे गोमांस व 9 लाख रुपयांचा ट्रक असा एकूण 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत शाहरुख खान रफिक खान 24 वर्ष , मोहम्मद जुबेर मोहम्मद शरीफ वय 20 वर्ष राहणार इस्माईलपुरा कामठी यांना अटक केली असून मोहम्मद तहसीम राजा कुरेशी अब्दुल गफार कुरेशी राहणार कामठी हा फरार झाला आहे
     ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांचे मार्गदर्शनात विरुरचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांचे नेतृत्वात हवालदार दिवाकर पवार, हवालदार मल्लेश नर्गेवार, पोलीस नरेश शेंडे, संतोष आडे, देवाजी टेकाम, सुरेंद्र काळे यांनी केली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत