दिल्ली:- महाविद्यालयीन (College) वियार्थ्यांसाठी महत्वाची बातमी (News) समोर आली आहे. आतापर्यंत बीए (B.A), बीएससी (B.Sc) किंवा बीकॉम (B.Com) शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांत (three Year) पदवी (Degree) मिळत असे. मात्र पुढील वर्षांपासून पदवी शिक्षण पूर्ण करण्यासाठी चार वर्षे (four yeark अभ्यास करावा लागणार आहे.
UGC ने चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाची (FYUP) रूपरेषा तयार केली आहे. येत्या शैक्षणिक वर्षात 2023-2024 मध्ये सर्व देशभरातील सर्व विद्यापीठांमध्ये (University) याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. म्हणजेच पुढील वर्षी जे विद्यार्थी बीए, बीएस्सी किंवा बीकॉमला प्रवेश घेतील, त्यांचा अभ्यासक्रम चार वर्षांचा असणार आहे. अहवालानुसार, UGC पुढील आठवड्यात सर्व विद्यापीठांसह चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाचे नियम सांगणार आहे.
4 वर्षांचा अभ्यासक्रम सर्व विद्यापीठांमध्ये लागू असेल...
पदवी अभ्यासक्रमाच्या कालावधीत करण्यात आलेला बदल देशातील सर्व 45 केंद्रीय विद्यापीठांमध्ये लागू करण्यात येणार आहे. केंद्रीय विद्यापीठांसह बहुतांश राज्यस्तरीय आणि खासगी विद्यापीठात चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम राबवणार आहेत. अहवालानुसार, देशातील अनेक डीम्ड युनिव्हर्सिटीही ते स्वीकारण्यास तयार आहेत.
तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे काय?
वर्षभराच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश (Admition) घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही चार वर्षांचा अभ्यासक्रम स्वीकारण्याची सुविधा दिली जाईल. यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांच्या मते, 4 वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाची संपूर्ण योजना लवकरच सर्वांना सांगण्यात येईल.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत