गडचिरोली:- नक्षल्यांच्या पीएलजीए सप्ताहादरम्यान पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक अनूज तारे, कुमार चिंता, यतीश देशमुख यांच्य नेतृत्वात नागरिकांनी स्वत:जवळ बाळगलेल्या भरमार बंदूका स्वच्छेने पोलिसांकडे सोपविण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत जिमलगट्टा उपविभागातील नागरिकांनी नक्षल सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी 8 डिसेंबर रोजी 20 भरमार बंदूका उप पोलिस स्टशन दामरंचा येथे स्वाधीन केल्या.
गडचिरोली जिल्ह्यात माठ्या प्रमाणात जंगलक्षेत्र असल्यामुळे येथील दुर्गम, अतिदुर्गम भागातील सामान्य नागरिक आपल्या पारंपारिक शेती व्यवसायाबरोबरच शिकार करून उदरनिर्वाह करीत होते. शिकार करण्यासाठी तसेच वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी अनेक समान्य नागरिक बंदूका बाळगत होते. अशाचप्रकारच्या वडिलोपार्जित बंदूका व शस्त्रे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांकडे उपलब्ध आहेत.
दुर्गम, अतिदुर्गम भागात नक्षलवादी याच बाबीचा फायदा घेऊन सर्वसामान्य जनतेला नक्षल चळवळीत समाविष्ठ करण्याचा प्रयत्न करतात. याकरीता पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या संकल्पनेतून नागरिकांनी स्वत:जवळ बाळगलेल्या बंदूका स्वच्छेने जवळच्या पोलिसा ठाण्यात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या अवाहनाला प्रतिसाद देत दामरंचा हद्दीतील नागरिकांनी स्वत:जवळ असलेल्या 20 भरमार बंदूका दामरंचा पोलिसांच्या स्वाधीन केल्या.