Click Here...👇👇👇

श्री शिवाजी महाविद्यालयात संविधान दिन साजरा.

Bhairav Diwase
श्री शिवाजी महाविद्यालयात संविधान दिन साजरा


(आधार न्युज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात
राजुरा:- श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथक व राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये एक भारतीय घटनेबद्दल जागरूकता व्हावी, संविधानाचे महत्व व त्यातील कलमे आणि भारतातील प्राचीन लोकशाही चौ इतिहासाची माहिती व्हावी यासाठी "भारत- लोकतंत्र की जननी" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून श्री संतोष मेश्राम यांनी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात भारतातील प्राचीन लोकशाहीचा संदर्भ देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून भारताची लोकशाही बलाढ्य केली, ताकतवर केली आणि आपल्या संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्य सोबतच विविध कलमांचा उलगडा करत, आपले संविधान विद्यार्थ्यांना, उपस्थितांना अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुंबई येथे झालेल्या 26/ 11 आतंकवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण केल्या गेली. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड, प्रमुख उपस्थितीमध्ये उपप्राचार्य डॉ  आर आर खेरानी, प्रा. विश्वास शंभरकर आणि आयोजक म्हणून डॉ. राजेंद्र मुद्दमवार, प्रा. गुरुदास बल्की व महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, रासेयो स्वयंसेवक आणि इतर विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्वल बोबडे, प्रास्ताविक डॉ मुद्दमवर तर आभार निखिता जोगी हिने केले.