Top News

नादुरुस्त उभ्या ट्रॅक्टरला धडक #chandrapur #accident


अर्ध्या तासात एकाच ठिकाणी दोन अपघात


(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- चंद्रपूर गडचिरोली - महामार्गावरील व्याहाड (बुज) जवळ असलेल्या नादुरुस्त ट्रॅक्टर ला अर्ध्या तासाच्या आत दोन वाहने धडकल्याने झालेल्या अपघात एकाचा मृत्यू तर सात जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार 16 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. 

प्राप्त माहितीनुसार, MH 35 G 7665 क्रमांकाची नादुरुस्त ट्रॅक्टर व्याहाड (बूज) नजीक उभी होती. दरम्यान खुशाल माणिक वासेकर (35) हा MH 34 BY 6141 क्रमांकाच्या दुचाकीने गडचिरोलीला कामाला जात असायचा आणि सायंकाळला गडचिरोली वरुन गावाकडे येत असताना नंदिनी बार व्याहाड (बूज) जवळ उभ्या नादुरुस्त ट्रॅक्टरला धडक देऊन झालेल्या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार बसल्याने जागेवरच मृत्यु झाला.

तर दुसरा अपघात त्याच ट्रॅक्टरला अर्ध्या तासाने गडचिरोली वरून मुलकडे जाणारी MH 21 AH 7717 क्रमांककाच्या स्कार्पिओ वाहनाने धडक दिली असता त्या वाहनात असलेले सात प्रवासी जखमी झाले असुन त्यापैकी चार जणांना गडचिरोली येथील रुग्णालयात हलवण्यात आले तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यामूळे त्यांना नागपूरला हलविण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. या मार्गावर आतापर्यंत अनेक अपघात घडले असून सदर अपघाताने मात्र हा मार्ग अपघाताचे प्रवनस्थळ ठरत ठरत असल्याचे बोलल्या जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने