गांजा बाळगणाऱ्या आरोपीला अटक #chandrapur #bramhapuri

Bhairav Diwase


ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी शहरात अवैधरीत्या गांजा बाळगणाऱ्यावर शहरातील कुर्झा वार्ड येथे राहणारे विनायक चोले याचे घरी पोलीसांनी छापा टाकून त्याचे घरातून १ किलो ८८२ कि. ग्रॅ. गांजा जप्त केला. आरोपीस ताब्यात घेउन त्याचेवर कार्यवाही करण्यात आली.

ब्रम्हपूरी पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलीसांनी पचासह त्याचे घरी छापा टाकला असता त्याचे घरात कॉलेज बॅगमध्ये लपवून ठेवलेला १.८८२ कि.ग्रॅ. गांजा आढळून आला. आरोपीवर अप. क्रं. ५९५/२२ कलम २० (ब) एन.डी.पी.एस. ॲक्ट सन१ ९८५ अन्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आले.

सदरची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी मिलींद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन ब्रम्हपूरीचे ठाणेदार रोशन यादव, सपोनी प्रशांत ठवरे, पोउपनी स्वाती फुलेकर, योगेश शिवनकर, मुकेश गजबे, संदेश देवगडे, शुभांगीनी शेमले यांनी केलेली आहे. पूढील तपास पोलीस उपनिरीक्षकस्वाती फुलेकर करीत आहेत.