Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

शेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death


शीर झाले धडावेगळे


गडचिरोली:- पीक लागवडीसाठी ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना आरमाेरी तालुक्यातील वडधानजीकच्या एका शेतात रविवारी (दि. ४) सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत युवकाचे शीर धडावेगळे झाले.

अंकुश रामभाऊ दाेडके (२९, रा. देलाेडा खुर्द) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. अंकुश दाेडके हा वडधा येथील राजेंद्र ठाकूर यांच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत हाेता. नेहमीप्रमाणे ताे रविवारी ट्रॅक्टर चालविण्यासाठी गेला हाेता. रविवारी वडधा-खरपी मार्गावरील नाल्यालगत असलेल्या परसराम सयाम यांच्या शेतात ट्रॅक्टरला राेटावेटर जाेडून मशागतीचे काम सुरू हाेते.

दरम्यान, सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास अपघात घडला. अपघातात अंकुशचा चेंदामेंदा हाेऊन शीर धडावेगळे झाले. एक पायसुद्धा तुटला. विशेष म्हणजे, एका बांधित मृतकाचे प्रेत हाेते, तर दुसऱ्या बांधित ट्रॅक्टर उभे हाेते. त्यामुळे अपघात नेमका कसा घडला याबाबत अनेक शंका आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत