चंद्रपूर:- शहरातील ऐतिहासिक रामाळा तलावाचे (Ramala Lake) जलप्रदुषण (Water pollution) टाळण्याकरिता तलावात (lake) येणारा मच्छीनाला त्वरित वळते करून जल शुद्धीकरण संयत्र (Water Purification Plant) उभारणे गरजेचे आहे. मात्र याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्या जात आहे. चंद्रपूर शहर (Chandrapur city) हे गोंडकालिन शहर (Gondkalin City) आहे. गोंडराजांनी शहरात किल्ला, परकोट व रामाळा तलावाची निर्मिती केली. सुमारे ५०० वर्षांपेक्षा अधिक प्राचीन इतिहास असलेला रामाळा तलाव शहराच्या मध्यभागी (Ramala lake in the center of the city) असल्याने आकर्षणाचे केंद्र आहे. मात्र तलावाचे सौंदर्य व व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाले.
सध्या रामाळा तलावातील पाणी स्थिर असून यामुळे तलावात मोठ्या संख्येत शेवाळ (Algae) साचल्याने तलावाच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा त्रास होत आहे. परिणामी पुन्हा एकदा रामाळा तलाव महाकाय गटार झाला आहे. (Once again Ramala Lake has become a giant drain) दुर्गंधीचा (stench) त्रास तातडीने कमी व्हावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत