विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास चालना देणाऱ्या स्पर्धा:- गटशिक्षणाधिकारी समाधान भसारकर #chandrapur #Gondpipari

Bhairav Diwase
केंद्रस्तरीय नाविण्यपूर्ण नवरत्न स्पर्धा भंगाराम तळोधी येथे संपन्न


गोंडपिपरी:- आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्य जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत केंद्रस्तरापासून तर जिल्हा स्तरापर्यंत अश्या नाविण्यपूर्ण नवरत्न स्पर्धाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.भंगाराम तळोधी केंद्रांतर्गत "केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धांचे आयोजन" भंगाराम तळोधी शाळेत करण्यात आले.

या स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी उदघाटक म्हणून सौ.लक्ष्मी बालुगवार सरपंच ग्रा. प.भंगाराम तळोधी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री राकेश भाऊ कटकमवार अध्यक्ष शा.व्य.समिती भंगाराम तळोधी होते.विशेष अतिथी म्हणून श्री विजय पेरकावार उपाध्यक्ष शा.व्य.समिती तर प्रमुख पाहुणे म्हणून मालनताई धाबर्डे,श्री दुशांत निमकर केंद्रप्रमुख केंद्र भंगाराम तळोधी,सुधाकर मडावी मु अ भंगाराम तळोधी,तोषविनाथ झाडे मु.अ पारगाव,नानाजी मडावी मु.अ.सालेझरी,सुनील उईके मु.अ. पानोरा,मनोहर आंबोरकर मु. अ. सुपगाव,विनोद चांदेकर मु अ नंदवर्धन यांच्या उपस्थितीत पार पडले.

प्राथमिक विभाग (इयत्ता १ ते ५) कथाकथन स्पर्धा प्रथम समृद्धी बचाले,द्वितीय गणेश भोयर,स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धा प्रथम क्रमांक आरोही चौथाले द्वितीय गणेश भोयर,वादविवाद स्पर्धा प्रथम क्रमांक समृद्धी बचाले,द्वितीय शिव कोत्तवार,भूमीकाभिनय स्पर्धा प्रथम कुंजन विरुटकर,द्वितीय राशी नागापुरे,स्वयंस्फूर्त लेखन स्पर्धा प्रथम सिद्धी पेरकावार, द्वितीय ईशान पोटे,बुद्धिमापन स्पर्धा प्रथम क्रमांक सिद्धी पेरकावार द्वितीय गणेश भोयर,सुंदर हस्ताक्षर स्पर्धा प्रणय झाडे,द्वितीय तृष्णा घोगरे,स्मरणशक्ती स्पर्धा प्रथम शिव कोत्तावार,द्वितीय पूर्वी कुडे तर उच्च प्राथमिक विभाग (इयत्ता ६ ते ८) कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांक सानिका पोटे,द्वितीय दामिनी येलेकर,स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक गुलशन पोटे,द्वितीय क्रमांक मोनिका आत्राम, वादविवाद स्पर्धेत प्रथम नमन नागापुरे द्वितीय सरिता चौधरी, भूमीकाभिनय स्पर्धेत प्रथम चेतन वाकुडकर,द्वितीय समीक्षा भोयर,स्वयंस्फूर्त लेखन स्पर्धेत प्रथम श्रेयस हस्से,द्वितीय अर्पिता उंबरकर,बुद्धिमापन स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वरा कत्रोजवार,द्वितीय सानिका कडतलवार,सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम प्रज्ञा उंबरकर,द्वितीय अनुराधा फुलमारे, स्मरणशक्ती स्पर्धेत प्रथम स्नेहा फलके, द्वितीय विश्रांती राजकोंडावार यांनी पटकावला.

विजेत्या स्पर्धकांना समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी मा.समाधान गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गोंडपीपरी व अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.सदर स्पर्धेच्या विजेत्यांना सन्मानचिन्ह सुधीर सहारे,कांता निकुरे,श्रावण गुंडेट्टीवार,राजेश्वर अम्मावार
यांच्या सौजन्याने देण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश झाडे तर आभारप्रदर्शन विकास झाडे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तानाजी अल्लीवार,अनिल चोखारे,आनंद मेश्राम,अरुण झगडकर, प्रणिता उईके मॅडम व केंद्रातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.