Top News

सट्टापट्टी अड्यावर पोलिसांची धाड #chandrapur #Korpana #Gadchandur



कोरपना:- कोरपना लगत एका इसमाने सट्टा पट्टी झंडी मुंडीचा व्यवसाय कोरपना येथे सुरु केले होते. त्याची गुप्त माहिती ठाणेदार ढाकणे यांना कळताच त्यांनी आपल्या ताफ्ह्यासह कोरपना लगतच्या सट्टा-पट्टी अड्यावर धाड मारून आरोपी सुधाकर गावंडे, देवराव खनके, राजेश लोणारे, यांना अटक करून ४१६०० रुपयंचा नगदी मुद्देमाल व मोबईल जप्त करून अपराध क्र.२३८ भां.द.वि.१२ अ गुन्हा दाखल केला तसेच आणखी चार आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

🏥
सर्वत्र अवैध्य व्यवसायामुळे असंतोष उफाळून आला व नागरीकात चिड निर्माण झाली होती या बाबतच्या अनेक तक्रारी वरिष्ठ कार्यालया कडे दाखल करण्यात आल्या होत्या. गेल्या एक महिन्या पासून शांतता असताना व पोलिसांच्या कारवाईचा सपाटा सुरू असताना मात्र स्वतःला दबंग व मॅनेज करणाऱ्या पत्रकाराचे अखेर पोलिसांनी मुस्के आवळले. हि कारवाही कोरपना पोलीसांनी केली
🏥

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने