दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार #chandrapur #Korpana #wani #accident

Bhairav Diwase


वणी:- तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खांदला फाट्याजवळ दि. २ डिसेंबर रोजी सायंकाळी ७. वाजताच्या दरम्यान अपघात घडला. वैभव विलास हरबडे (२५) रा. काटला बोरी, ता. कोरपना जि चंद्रपूर असे अपघातातील तरुणाचे नाव आहे.

सदर तरुण हा दुचाकी क्रमांक (एम एच ३४ बि डी २७१८) कोरपना कडे जात असतांना खांदला फाट्याजवळ त्याची दुचाकी अज्ञात वाहनाला धडकल्याने हा भीषण अपघात झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

या घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच ते तात्काळ अपघातस्थळी पोहचले. तूर्तास अपघाताचे नेमके कारण शोधण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला जात आहे.