महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा पदी प्रतिमा ठाकूर यांची नियुक्ती #chandrapur #MNS

Bhairav Diwase


चंद्रपूर:- महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा पदी प्रतिमाताई ठाकूर यांची नेमणूक करण्यात आली आहे. हि नियुक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणे व कार्यक्रम इत्यादी आपण वेळोवेळी आपल्या संघटनेत निष्ठेने राबवावी व यामध्ये आपणांकडून कोणतीही कुचराई अथवा तडजोड स्विकारली जाणार नाही याची आपण नोंद घ्यावी. आपण व आपल्या सहकार्यांकडून समाजाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही अशा प्रकारचे आपले वर्तन असेल हिच अपेक्षा! असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.