Top News

जुन्या पेंशनकरीता १ लाखाच्यावर कर्मचारी धडकले नागपूरातील हिवाळी अधिवेशनावर #chandrapur #Nagpur



नागपूर:- 'एकच मिशन- जुनी पेन्शन' चा नारा देत बापूकुटी सेवाग्राम,वर्धा येथून सुरू झालेली 'पेन्शन संकल्प यात्रा 'आज मंगळवारी नागपुरात विधिमंडळावर धडकली. जुन्या पेन्शनच्या नावाने केंद्र सरकार आणि अन्य राज्य सरकारे नवीन पावले उचलत असताना महाराष्ट्र सरकार आंधळेपणाचे नाट्य करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या मोर्चाने केला.येत्या निवडणुकीत 'जो देईल पेन्शन, त्यालाच देऊ समर्थन' असा इशाराही देण्यात आला.

राज्य सरकारने लागू केलेली नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी आज राज्यभरातून एक लाखापेक्षा जास्त कर्मचारी हिवाळी अधिवेशनावर धडकले. हा मोर्चा नागपूरकरच नव्हे तर राज्यकर्त्यांच्या मनात धडकी भरवणारा ठरला. नवसाला पावणाऱ्या टेकडी गणेश मंदिरापासून ते यशवंत स्टेडियम धंतोली - सीताबर्डी ते मॉरीस कॉलेज टी पॉइंट पर्यंत रस्त्यांवरून सायकलसुद्धा निघू शकत नव्हती, इतकी गर्दी या मोर्चाने शहरात झाली होती.जुनी पेंंशन संघटनेच्या मोर्च्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेसह मंत्री शंभुराज देसाई,आमदार कपील पाटील आदींनी भेट दिली.त्यानंतर एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विधानभवनात भेट घेत निवेदन सादर केले व सविस्तर चर्चा केली.जोपर्यंत मागण्या मंजूर होणार नाही,तोपर्यंत आंदोलक बसून राहणार असा इशाराच सरकारला दिला.

पेन्शन लागू करून तेथील कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहे. त्यांच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेत आहे.परंतु, महाराष्ट्र सरकार झोपेचे सोंग घेऊन टाळाटाळ करीत आहे.त्यामुळे महात्मा गांधी यांचा आदर्श ठेवत 'करेंगे या मरेंगे' चा नारा देत गांधी भूमी ते नागपूर विधिमंडळावर ही 'पेन्शन संकल्प यात्रा ' काढण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. मोर्चाचा शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून मागण्यांचे निवेदन दिले.वितेश खांडेकर,गोविंद उगले,प्राजक्त झावरे, आशुतोष चौधरी,प्रवीण बडे व सुनील दुधे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने