पोंभूर्णा:- उप पो. स्टे उमरी पोतदार अंतर्गत असलेल्या डोंगरहळदी शेतशिवारात छापा टाकला असता ३ इसम २ दुचाकी वाहनानी दारूची देवाण घेवाण करताना पोलिसांनी धाड टाकली. यात २ इसमाना पाठलाग करून पकडण्यात आले. त्यांचेकडून चुंगळीत असलेल्या ५०० नग देशी दारू शिशा आणि मोपेडच्या डिकीत असलेले वीस हजार रूपये, दोन टुव्हीलर गाड्या हस्तगत करण्यात आले.
यावेळी आरोपी लोमेश श्रावण कनाके रा. डोंगरहळदी व निशांत डोहाने रा. बाबुपेठ, चंद्रपूर यांना ताब्यात घेतले असून आदेश किसन आदे रा. डोंगरहळदी हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.
आरोपी विरुध्द कलम 65(अ)(ई),83 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही ठाणेदार किशोर शेरकी, सूर्यकांत तोडकर,अजय गुरूनुले,संदीप चुदरी,राकेश खैरे,विजू झरकर यांनी केली.