केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धेत चेक आष्टा शाळेचे दहा रत्न #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
0

प्राथमिक गटातील चार; उच्च प्राथमिक गटातील सहा विद्यार्थ्यांना मिळाले यश


पोंभूर्णा:- दिनांक 14 डिसेंबर ला केंद्र चिंतलधाबा येथे केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत प्राथमिक व उच्च प्राथमिक असे दोन गट होते. जि.प. उच्च प्राथ. शाळा चेक आष्ट्याचे दहा विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. प्राथमिक गटातील चार तर उच्च गटातील सहा विद्यार्थ्यांनी यश मिळाल्याने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्व यशप्राप्त विद्यार्थ्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून गावातील उच्च शिक्षीत तरूण आणि नागरीकांनी हार्दिक अभिनंदन केले.

प्राथमिक गटात एकपात्री अभिनय प्रथम क्रमांक अंकिता राकेश मडावी, वादविवाद प्रथम क्रमांक नंदिनी सुनिल मरस्कोल्हे, स्वयंस्फूर्त भाषण द्वितीय क्रमांक निधी प्रभाकर मरस्कोल्हे स्मरणशक्ती द्वितीय क्रमांक पियुष अरविंद बोंडे या चार विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे.

उच्च प्राथमिक गटात कथाकथन प्रथम क्रमांक लोचना रमेश रासपल्लीवार, स्वयंस्फूर्त भाषण प्रथम क्रमांक ज्ञानशी गंगाधर कुळमेथे, वादविवाद प्रथम क्रमांक ज्ञानेश्वरी प्रितम कुंभरे, सुंदर हस्ताक्षर प्रथम क्रमांक तनिषा अरविंद बोंडे, स्वयंस्फूर्त लेखन प्रथम क्रमांक शिवानी दामोधर येरमे, बुद्धीमापन द्वितीय क्रमांक अभिप्राय अनिल सोनटक्के या सहा विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे.

या यशाच्या पर्वात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक मुख्याध्यापक अरूण यामावार, स्पर्धेचे मार्गदर्शक विनोद पोगुलवार, सहकार्य कु. सविता लाकडे, सतीश शिंगाडे सर यांनी विद्यार्थ्यांचे गोड कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)