Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

चंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी! #Chandrapur #pombhurna

2 तांब्याच्या खाणी वेदांता कंपनी सुरु करण्याची शक्यता!


पोंभुर्णा:- चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील ठाणेवासना, गोंडपिपरी तालुक्यातील दुबारपेठ, येथे 7.2 मिलियन टन इतके मोठे तांब्याचे साठे असून, त्या ठिकाणी वेदांता कंपनी दोन खाणी सुरू करण्याच्या तयारीत आहे.


1 फेब्रुवारी 2019 मध्ये राज्य शासनाने वेदांताला आमंत्रित केले होते. ठाणेवासना येथे 768.72 हेक्टर जागेवर, तर दुबारपेठ येथे 816.29 हेक्टर जागेवर या खाणी प्रस्तावित असून, दोन्ही खाणी मिळून 7.2 मिलियन टन तांब्याचे साठे काढले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात चालको पायराईट, पायराईट, मॅग्नेटाइत, स्फिन, रुटाईल, डायमेनाईट, बोराईट, गोथाइट, क्रोमाइट, कोवेलाइट आणि ग्राफाईटसारखे मौल्यवान खनिजेसुद्धा आढळली. परंतु, यापैकी तांबे मात्र मोठ्या प्रमाणात आढळले. भारतीय भुविज्ञान सर्वेक्षण विभागाने 1971-1979 वर्षाच्या काळात येथे सर्वेक्षण केले होते. 2004 साली यावर शासनाने सविस्तर अहवाल प्रकाशित करून खाण सुरू करण्यासाठीच्या हालचालीही सुरू केल्या होत्या. 2019 मध्ये प्रक्रिया सुरू करून वेदांता कंपनीला आमंत्रित केले होते, अशी माहिती भूगर्भ शास्त्राचे अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत