Top News

चंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur


चंद्रपूर:- विदर्भातील चंद्रपूर शहराने वायू प्रदूषणाचा उच्चांक गाठला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने जाहीर केलेल्या एअर क्वॉलिटी इंडेक्स Air quality index (AQI) च्या आकडेवारीनुसार चंद्रपूर शहरातील हवा नोव्हेंबर महिन्यात 30 पैकी तब्बल 7 दिवस अतिशय धोकादायक, 22 दिवस धोकादायक आणि फक्त एक दिवस सामान्य होती.

 चंद्रपूर जिल्हा हा देशातील अग्रगण्य औद्योगिक जिल्हा आहे. देशाला सर्वाधिक कोळसा, वीज, कागद आणि सिमेंट या जिल्ह्यातून मिळतो. मात्र त्याच जिल्ह्यातील लोकांचा जीव प्रदूषणाने गुदमरला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने