Top News

बिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurnaपोंभुर्णा:- पोंभूर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या देवाडा बिटातील बोर्डा झुल्लूरवार येथील व्यक्तीवर बिबट्याने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना दि. ०४ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. काशीनाथ बुरांडे (वय ५० वर्षे) असे आहे. बिबट्याने गावात प्रवेश घेत इसमावर हल्ला केला. जखमीला ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे

हेही वाचा:- बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी; वनमजूरावरही बिबट्याने केला हल्ला https://www.adharnewsnetwork.com/2022/10/chandrapur_27.html


   घटनेची माहिती वनविभागाला माहिती मिळताच वन अधिकारी व वनकर्मचारी घटनास्थळी दाखल  झाले असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी फणिंद्र गादेवार यांनी आधार न्युज नेटवर्क ला दिली. 

पुढील तपास वनपरिक्षेत्राधिकारी फणिंद्र गादेवार यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक आनंदराव कोसरे, वनरक्षक शेंडे व त्यांची टीम करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने