Top News

बाळासाहेबांची शिवसेना पोंभुर्णा तालुका नियुक्ती जाहीर #chandrapur #pombhurna


तालुका प्रमुख पदी पंकज वडेट्टीवार तर तालुका उप प्रमुख पदी शुभम वासेकर यांची नियुक्ती


पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेना पोंभुर्णा तालुका प्रमुख पदी पंकज वडेट्टीवार तर तालुका उप प्रमुख पदी शुभम वासेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.‌ हि नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व पुर्व विदर्भ किरण पांडव यांचे सूचनेनुसार बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी केली आहे.

पोंभुर्णा तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेनेत युवकांना संधी मिळाल्याने शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. येणाऱ्या काळात बाळासाहेबांची शिवसेनेच्या पदाचा वापर संघटन वाढीसाठी करून जनसामान्यांना न्याय देण्याचे कार्य करीत अशी अपेक्षा जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने