पोंभुर्णा:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत आंतर महाविद्यालयीन हँडबॉल मुलींची स्पर्धा दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, द्वितीय क्रमांक नेवजबाई हितकरणी महाविद्यालय ब्रह्मपुरी आणि तृतीय क्रमांक आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा, यांनी पटकाविला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रा. डॉ. ओमप्रकाश सोनोने, उद्घाटक कलबीर सिंग कलसी आर. टी. ओ ऑफिसर चंद्रपूर, प्रमुख पाहुणे डॉ. धीरज भोसकर स्पोर्ट ऑफिसर जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग. नागपूर, श्री राकेश बन्सोड भोसले मिलिटरी स्कूल नागपूर, श्री प्रकाश तुमाने ट्रेझरी हँडबॉल असोसिएशनप्रकाश चंद्रपूर. स्पर्धेचे प्रभारी. डॉ. संघपाल नारनवरे. डॉक्टर शैलेंद्र गिरीपुजे व संतोष कुमार शर्मा प्राध्यापक नितीन ऊपरवट यांनी यशस्वीपणे स्पर्धेचे आयोजन केले.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत आंतर महाविद्यालयीन हँडबॉल मुलांची स्पर्धा दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये एकूण दहा महाविद्यालयाच्या संघाने भाग घेतलेला. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा, द्वितीय क्रमांक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी आणि तृतीय क्रमांक नेवजबाई हितकरणी महाविद्यालय ब्रह्मपुरी यांनी पटकाविला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण निदेशक प्राध्यापक संतोष कुमार शर्मा सर, डॉक्टर शैलेंद्र गिरीपुंजे सर, डॉक्टर संघपाल नारनवरे सर या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे शारीरिक शिक्षण निदेशक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव वेगीनवार सर, महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांचे या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मोठे योगदान लाभले.