राजुरा:- राजुरा तालुक्यातील येणाऱ्या लक्कडकोट येथील सम्राट अशोक महाविद्यालय येथे विरूर स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार जय प्रकाश निर्मल साहेबांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम बद्दल मार्गदर्शन केले. तसेच गाड्या संबंधित माहिती दिली. आणि गुड टच. ब्याड टच म्हणजे काय या बद्दल सविस्तर माहिती दिली. मुला मुलींना पोस्को काय असते, कोणती कलम असते त्यांची माहिती दिली. ठाणेदार साहेबांनी जे मुलांना मुलींना मार्गदर्शन दिला त्या करिता शिक्षक वर्गणी त्यांचे आभार मानले. उपस्थित कर्मचारी लककडकोट बीट मेजर मल्लया नारगेवार व ट्रॅफिक मेजर विजय कुमार मुंडे उपस्थित होते.
ठाणेदार जय प्रकाश निर्मल यांनी शाळकरी मुलांना केले मार्गदर्शन #chandrapur #Rajura
मंगळवार, डिसेंबर २७, २०२२