विरुर स्टेशन येथील मुख्य रस्त्याचे सरपंच अनिल आलाम यांच्या हस्ते भूमिपूजन #chandrapurराजुरा:- विरुर येथील मुख्य रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे अशी गावकऱ्यांची मागणी जोर धरू लागली होती त्यातच ठेकेदार गाहोलोत यांनी आज करू उद्या करू यातच वेळ घालवला पण वर्ष होऊन सुध्दा मुख्य रस्त्याचे काम करण्यास असमर्थ पना दाखवली व त्यांच्या मते स्थानिक गावातील काही नागरिक अडचण निर्माण करून काम थांबवण्याचे काम करीत असून हे काम मी बिलकुल करणार नाही असे स्पष्ट केले व त्या नंतर थोरात यांनी मुख्य रस्त्याचे काम हाती घेऊन 2 महिन्यात काम पूर्ण करण्याचे सरपंच अनिल आलाम यांना आश्वासन दिले व गावातील नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत