चंद्रपूर:- सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्या बाबूपेठ परिसरातील हनुमान किराणा दुकानात शहर पोलिसांनी धाड टाकून १ लाख १४ हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू मंगळवारी जप्त केला. हनुमान आंबटकर आणि त्याची पत्नी मेघा हनुमान आंबटकर यांच्यावर अन्नसुरक्षा कायद्यानुसार कारवाई केली आहे.
हनुमान आंबटकर (३४) हा सुगंधीत तंबाखूचा पुरवठा करीत असल्याच्या माहितीवरून हनुमान आंबटकर यांच्या दुकानावर धाड टाकून एक लाख १४ हजार ३७२ रुपये किंमतीचा पान मसाला, विमल, सुगंधित तंबाखू, शिशा तंबाखूची ५०.३ किलोची पाकिटे जप्त केली.
हि कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय अधिकारी सुधीर नंदनवार, शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिसांनी केली.