कोर्टाच्या आवारातच तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल #chandrapur

Bhairav Diwase


ब्रम्हपुरी:- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या गेटवरच एका तरुणीने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही युवती गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील रहिवासी आहे.

युवतीचे नाव पौर्णिमा मिलिंद लाडे (वय 27) असे आहे. ती गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील रहिवासी होती. आज सकाळी तिचा मृतदेह गळफास लावून असलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.