आंतरमहाविद्यालयीन हँडबाल मुलींच्या स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय प्रथम #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
0


चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत आंतर महाविद्यालयीन हँडबॉल मुलींची स्पर्धा दिनांक २९ नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर प्रथम क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयातील दिपाली शेंडें, अर्पिता टेकाले, मोनिका गराड, सीमा भडके, पुजा आसेकर, जया कटकोजवार, राजश्री पचारे, गायत्री इटनकर, खुशी चहारे, पल्लवी गेडाम यांनी  प्रतिनिधित्व केले.

संघाच्या या यशाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुधाताई पोटदुखे, कार्यकारी अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव तथा गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दिक्षित, सदस्य सगुणाताई तलांडी, राकेश पटेल, एस. के. रमजान, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माघमशेट्टीवार, प्रभारी प्रबंधक विनोद चोपावार, शा. शि. विभाग प्रमुख डॉ. विजय ए. सोमकुंवर, डॉ. कुलदीप आर. गोंड, हनुमंतु डंबारे, प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)