आज पालकामंत्र्याच्या हस्ते डीकेपीएल सिजन ४ चे उदघाटन #chandrapurराजुरा:- युवकांमधील खिलाडीवृत्तीला व्हावं देण्यासाठी आयपीएल च्या धर्तीवर राजुरा येथील धनोजे कुणबी युवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ द्वारा आयोजित मॉर्निंग क्रिकेट क्लब, राजुरा व रॉयल क्रिकेट क्लबच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी डीकेपीएल सिजन - ४ चे उदघाटन आज (दि. ३०) सायंकाळी दुपारी तीन वाजता शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उदघाटन होत आहे.

कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून राज्याचे सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार राहणार असून अध्यक्ष म्हणून माजी आमदार वामनराव चटप प्रमुख अतिथी माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर, मनोहर पाऊनकर माजी अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, देवराव भोंगळे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर दौलतराव भोंगळे अध्यक्ष धनोजे कुणबी समाज मंडळ, देवराव निब्रड सचिव धनोजे कुणबी समाज मंडळ, सुनील उरकुडे माजी सभापती जी.प. चंद्रपूर, कुंदाताई जेणेकर माजी सभापती, सतीश धोटे, दिनकर डोहे, अविनाश जाधव, साजिद बियाबानी, संभाजी वारकड, नरेंद्र काकडे, मयूर पाऊनकर, , रंजन लांडे, बबन उरकुडे, राजेंद्र डोहे, दीपाली हिंगाने यांच्या उपस्थिती संपन्न होत आहे.

मागील तीन वर्षांपासून येथील धनोजे कुणबी युवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने डीकेपीएल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. राजुरा विधानसभा क्षेत्र व त्या बाहेरील खेळाडूंचा या स्पर्धेत सहभागी असून मैदानावर मोठ्या प्रमाणात क्रीडा प्रेमींची उपस्थिती रहात असून उदघाटन सोहळ्याला जास्तीत जास्त संख्येने खेळाडूंनी उपस्थित राहण्याचे आव्हान येथील धानोजे कुणबी युवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या