सरदार पटेल महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन #chandrapur

Bhairav Diwase


चंद्रपूर:- सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे ग्रंथालय विभागातर्फे राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज आपण स्वातंत्र्याचे अमृत क्षण अनुभवत आहोत. त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सशक्त प्रजासत्ताक राष्ट्र उभारणीसाठीचे अमूल्य योगदान कारणीभूत आहे, अशी कृतज्ञताही प्राचार्यांनी व्यक्त केली आहे.


अभिवादन संदेशात प्राचार्य म्हणतात, मानव कल्याण हाच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनध्यास होता. त्यासाठीच त्यांनी ज्ञानसाधना केली. समाजात समता, बंधुता आणि लोकशाहीची मुल्ये रुजावीत यासाठी आपल्या विद्वत्तेचा विनियोग केला. आज आपण स्वातंत्र्याचे अमृत क्षण अनुभवत आहोत. त्यामागे डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या निर्मितीत दिलेले अमूल्य योगदान हे एक कारण आहे. यातून एक सशक्त असे प्रजासत्ताक राष्ट्र उभे राहू शकले. डॉ. आंबेडकर यांच्या या योगदानासाठी आपण सर्व कृतज्ञ राहूया आणि त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण व्हावा यासाठी कटीबद्ध होऊया. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!


या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. डॉ. भुत्तमवार, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.‌ कुलदीप आर. गोंड, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. विजय सोमकुंवर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. उषा खंडाळे, NCC प्रमुख डॉ. सतिश कन्नाके, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, स्वयंसेवक, स्वयंसेविका, खेळाडू तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.