चंद्रपुर शहरातील एकमेव शिवछत्रपती चौकातील शिव-स्मारकाकडे चंद्रपुर मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष #chandrapurचंद्रपुर:- शहरातील अंचलेश्वर रोडवर स्थित एकमेव भव्य शिव-स्मारक मागील काही दिवसा पासन अतिशय ख़राब परिस्थिती मधे आहे.यात मनपा प्रशासनाची उदासीनता दिसून येते. यामुळे शिव-स्मारकाचे नूतनीकरण व डागडुजी झाली पाहिजे या मागणीसह ११ नोव्हेम्बर ला मा. आयुक्त साहेब चंद्रपुर मनपा यांना यंग थिंकर्स चंद्रपुर तर्फे निवेदन देण्यात आले होते.यावर मनपा प्रशासन तर्फे लवकर आपली मागणी पुर्ण करू असे आश्वासन मा.आयुक्त साहेब यांनी दिले होते.

तरी सुद्धा आज दिनांक १३ डिसेम्बर पर्यन्त कोणत्याही प्रकारची हालचाल मनपा प्रशासन तर्फे झालेली नाही, यामुळे त्वरित शिव-स्मारकाचे डागडुजी व नूतनीकरण करण्यात यावे या मागणीसह आज यंग थिंकर्स चंद्रपुर तर्फे मा.आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यात आले.सोबतच पुढील दोन दिवसात जर, या विषया सन्दर्भात मनपा तर्फे कोणतीही हालचाल झाली नाही तर, चंद्रपुर शहरातील समस्त शिवप्रेमी यांच्यासह यंग थिंकर्स चंद्रपुर तर्फे येत्या काळात मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने यंग थिंकर्स चंद्रपुर चे सदस्य, मिनल चिकनकर, रोशनी नगपुरे, निशिकांत आष्टनकर, आकाश वानखेड़े, शंकर वांढरे, वैभव निंबाळकर आणि शुभम निंबाळकर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत