Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

सोयाबीन चोरीच्या संशयावरून दोघांना अमानुष मारहाण; गुन्हा दाखल #chandrapur


चंद्रपूर:- सोयाबीन चोरी केल्याच्या संशयावरून दोघांचे हातपाय बांधून पाईप व लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात असून पोलिसांनी मारहाण करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वरोरा येथील विनोद श्रावण देठे यांची आष्टी येथे सतरा एकर शेती आहे. शेतातील शेडमध्ये त्यांनी सोयाबीन ठेवले होते. देठे शेतात गेले असता त्यांना सोयाबीन कमी असल्याचे दिसले. त्यातील अंदाजे दहा क्विंटल सोयाबीन चोरीला गेल्याचे देठे यांच्या लक्षात आले. योगायोगाने त्याचवेळी संदीप रागीट व मोहन ठेंगणे हे दोघे दुचाकीने जाताना दिसले. त्या दोघांनीच शेतातील सोयाबीन चोरी केल्याचा संशय देठे यांना आला. त्यांनी दोघांना थांबवून त्यांचे हात-पाय बांधत मारहाण केली.

त्यानंतर देठे यांनी वरोरा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. दरम्यान, देठे हे संदीप रागीट व मोहन ठेंगणे यांना अमानुषपणे मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाला. त्यावरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत